पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! कोल्हापूरात मुलासह पाण्यात उडी घेऊन आई-वडिलांची आत्महत्या

कोल्हापूर : कोरोनामुळे आजूबाजूला परिस्थिती गंभीर बनलेली असताना अनेकांना हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. अशात लॉकडाऊनमुळे अनेकांचं आर्थिक गणित विस्कटलं आहे. त्यामुळेच अनेक जण सध्या टोकाचं पाऊल उचलत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून पोटच्या मुलासह आईवडिलांनी पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पन्हाळा तालुक्यातील कुंभी नदीपात्रात तिघांचे मृतदेह सापडले असून आई-वडिलांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला दोघांच्यामध्ये दोरीने बांधून कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे, त्यानंतर पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोठे गावातील दीपक शंकर पाटील वय 40, वैशाली दीपक पाटील वय 35 यांनी आपला 14 वर्षीय मुलगा विघ्नेश अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गोठे गावात आपले वडील, पत्नी आणि दोन मुले यासह राहत असलेले दीपक पाटील हे शेती व्यवसाय करीत होते. या बरोबरच जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करीत होते. या कुटुंबाच्या आत्महत्येने संपूर्ण कळे परिसर हळहळला. त्यांची 16 वर्षाची मुलगी मामाच्या गावी गेल्यामुळे या घटनेतून बचावली आहे. दीपक पाटील यांनी आत्महत्येपूर्वी घरात सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये जीवनात अयशस्वी झालो आहे. आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरु नये. वडिलांना आणि मुलीला सांभाळा असा मजकूर लिहिला आहे.