इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; सामना सुरु असतानाच पोलिसांकडून कारवाई
क्रीडा

इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; सामना सुरु असतानाच पोलिसांकडून कारवाई

लंडन : इंग्लंडमधील २९ वर्षीय क्रिकेटपटू डेव्हिड हाइमर्सला क्रिकेट सामाना सुरु असणाऱ्या मैदानामधूनच पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. क्लब क्रिकेटर म्हणून स्थानिक पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या डेव्हिडवर फार गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. डेव्हिडनने अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. डेव्हिड हा शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवायचा अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डेव्हिडला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्यानंतर इंग्लंड क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच ईसीबीनेही त्याच्यावर मोठी कारवाई करत त्याला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. द मिररमधील वृत्तानुसार डेव्हिडला पर्दाफाश करण्यासाठी गार्डियन्स ऑफ द नॉर्थ नावाच्या एका ग्रुपने सोशल मीडियावर एका अल्पवयीन मुलीच्या नावाने बनावट अकाऊंट ओपन केलं. तर या अकाऊंटवर डेव्हिड सतत अश्लील मेसेज पाठवायचा. हे एका अल्पवयीन मुलीचं अकाऊंट आहे याची संपूर्ण कल्पना असतानाही डेव्हिड यावर अश्लील मेसेज पाठवायचा.

डेव्हिड अशाप्रकारे अश्लील मेसेज प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत. मागील वेळेस त्याला पोलिसांनी इशारा देऊन सोडून दिलं होतं. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे. डेव्हिडने पोलिसांकडे जबाब नोंदवला असून त्यात त्याने आपण मुलींसोबत सेक्स चॅट करतायचे असं मान्य केलं आहे. अगदी १३-१४ वर्षाच्या मुलींसोबतही तो सेक्स चॅट करायचा. मुलींसोबत अशापद्धतीच्या गप्पा मारता याव्यात म्हणून त्याने सोशल नेटवर्किंगवर आपलं नावही बदललं होतं.