पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर
देश बातमी

पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या दहा दिवसांपासून सलग वाढत असताना आज अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 100.07 रुपयांवर पोहोचले आहे. तर परभणीत साध्या पेट्रोलचे दर 98 रुपये 12 पैसे तर पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपये 93 पैसे प्रतिलिटर इतके झाले आहेत. डिझेलचे दर 87 रुपये 74 पैशांवर गेले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढू लागल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नांदेडच्या धर्माबादमधील पेट्रोलच्या किमतीने 99 चा आकडा कालच पार केला होता.राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात इंधनाचे सर्वाधिक दर असणार्‍या परभणी जिल्ह्यात पुन्हा दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या किमतीत बुधवारी पुन्हा 24 पैशांनी वाढ झाली. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली आहे. पुण्यातील पेट्रोल पंपावर स्पीड पेट्रोल हे 98 रुपये तर साधं पेट्रोल हे 95.64 रुपये प्रती लिटरवर जाऊन पोहोचलं आहे.

भारतात पेट्रोलच्या किंमती वाढल्याने आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 95 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. दिल्लीत दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये/लीटर आणि डिझेल 79.70 रु./लीटर झालं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 95.75 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 86.72 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे.

तर दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये भारताच्या निम्म्या किंमतीत पेट्रोल उपलब्ध आहे. पाकिस्तानात ग्राहकांना पेट्रोल प्रतिलिटर 51.14 रुपये दराने मिळत आहे. त्याचबरोबर चीनमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर. 74.74 रुपये आहे. भारताच्या शेजारच्या देशांमध्ये भूतानमध्ये पेट्रोल 49.56 रुपये, पाकिस्तानात 51.14 रुपये, श्रीलंकेत 60.26 रुपये, नेपाळमध्ये 68.98 रुपये, बांग्लादेशात 76.41 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.

दरम्यान, भारतात पेट्रोलचे दर नवीन विक्रम नोंदवत असताना काही देशांमध्येही पेट्रोलची किंमत इतकी कमी आहे की आपण विचारही करु शकत नाही. व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल 1.45 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. इराणमध्ये पेट्रोलचे दर 4.50 रुपये प्रतिलिटर आहे. यासह अंगोलामध्ये पेट्रोलची किंमत 17.82 रुपये, अल्जीरियामध्ये 25.15 रुपये आणि कुवेतमध्ये 25.26 रुपये प्रतिलिटर आहे.

इंधनाचे दर पाहण्यासाठी…?
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवे दर हे सकाळी 6 पासूनच लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड आयओसीएलच्या वेबसाईटवर मिळेल.