डोंबिवलीतील लेबर कॅम्पला आग; 170 घरं जळून खाक
बातमी मुंबई

डोंबिवलीतील लेबर कॅम्पला आग; 170 घरं जळून खाक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की अनेक किमी अंतरावरूनही आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. या आगीत एका कामगारचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज सकाळी अचानक लेबर कॅम्पला लागलेल्या या आगीत अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. हातावर पोट भरणाऱ्या शेकडो कामगारांना बेघर व्हाव लागलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या दुर्दैवी घटनेनंतर आग आटोक्यात आणली असून परिसर थंड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डोंबिवलीतील कल्याण शील रोडवर एक बहुमजली इमारतीचं काम चालू आहे. ज्यामध्ये अनेक मजूर काम करीत होते. तसेच त्यांना राहण्यासाठी याठिकाणी सुमारे 200 घरं बांधण्यात आली होती. पण या आगीत अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत.

https://twitter.com/i_am_Ravindra1/status/1363404546806976517

या आगीत 170 हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे अनेक सिलिंडर्सचे स्फोटही झाले आहेत. या क्षणी आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं आहे. तसेच कुलींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लेबर कॅम्पला लागलेल्या आगीत आणखी जीवितहानी झाली आहे का? किंवा इतर कोणताही कामगार या आगीत सापडला आहे का? याचा शोध घेतला जात आहे.