वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत १४४ कलम लागू
बातमी महाराष्ट्र

 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत १४४ कलम लागू

जेजुरी : राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी निर्बंध लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. ज्यामुळे आता अनेक ठिकाणी पुन्हा एकदा जमावबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी महाशिवरात्री निमित्तानं जेजुरी गडावर गर्दी टाळण्यासाठी बुधवारपासून, म्हणजेच 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत या भागात 144 कलम म्हणजेच जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याचं चित्र लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जमाव बंदीचा कायदा तोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तसंच खंडेरायाच्या मंदिरावर पाताळ लोक पृथ्वी आणि अवकाशातील लिंगाचे दर्शनसाठी खंडोबा मंदिरावर भाविकांस सक्त बंदी करण्यात आली आहे. जेजुरी बाहेरून येणाऱ्यांसाठीही हेच नियम लागू असणार आहेत. या परिसरात असणारे हॉटेल, लॉज मालकांनाही मुक्कामी बुकिंग न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर जेजुरी आणि पंचक्रोशीत सार्वजनिक कार्यक्रम मिरवणुकीवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या देवगड मधील कुणकेश्वर मंदिरदेखील महाशिवरात्री पासून तीन दिवस भक्तांसाठी बंद असणार आहे. महाशिवरात्रीवर कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने यावर्षी महाशिवरात्री उत्सव साध्या पध्दतीने तसेच कोरोनाचे नियम व अटींनुसारच साजरा करावा असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 ते 14 मार्चपर्यंत कुणकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय कुणकेश्वर देवस्थान समितीने घेतला आहे. इतकंच नाही तर कुणकेश्वरमध्ये 10 ते 14 मार्चपर्यंत कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.