धक्कादायक! दिल्लीत पुन्हा हिंसाचार; स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष
देश बातमी

धक्कादायक! दिल्लीत पुन्हा हिंसाचार; स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिसांचाराची घटना ताजी असतानाच दिल्लीत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सिंघू बॉर्डरवर स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्षाचा भडका उडाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला असून, त्या भागात तणाव निर्माण झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर दिल्लीसह सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर या भागात पोलिस बंदोबस्त मोठ्या संख्येने तैनात आहे. शुक्रवारी सकाळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता आणि सर्व गाड्या 2 किलोमीटर अलीकडे अंतरावरच थांबविण्यात आल्या होत्या.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुरवातीला शांततेत आंदोलन सुरु होते. मात्र अचानक दोन्ही बाजूने गदारोळ झाला. शेतकरी आणि स्थानिक आंदोलनकर्त्यांमध्ये दगडफेक झाली, लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाणी झाल्या. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांनी ‘तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान’च्या घोषणा देत स्थानिकांनी शेतकरी आंदोलकांना महामार्ग रिकामा करण्याची मागणी केली.

आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर शेतकऱ्यांनी प्रथम हल्ला केला आणि शेतकरी आंदोलकांनी तलवारीने वार केल्याचा आरोप एका आंदोलन्कार्त्याने केला आहे. तर पोलिसांनी देखील पहिला हल्ला शेतकर्यांनी केला असून त्यांच्याककडून एक तलवार जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/ANI/status/1355069771289481217?s=20

तर दुसरीकडे, स्थानिक रहिवासी असल्याचा दावा करणाऱ्या आंदोलकांची पोलीस चौकशी करत आहेत. सिंघू सीमेवर वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे. शेतकर्‍यांच्या निदर्शनामुळे हा महामार्ग बंद असून आपल्यासमोर रोजीरोटीचे संकट निर्माण झाले आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.