आम्ही नारायण राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु: अमित शहा
राजकारण

आम्ही नारायण राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु: अमित शहा

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, राज्यात ऑपरेशन लोटसची असलेली धास्ती, राणेंनी आघाडी सरकारविरोधात उघडलेला मोर्चा, या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या सिंधुदुर्गातल्या कार्यक्रमाची चर्चा राज्यभर आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अमित शहा यांनी नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीत केलेल्या अन्यायावर भाष्य केले. ते म्हणाले की, “नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे.”

मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

यावेळी अमित शहांनी बोलताना महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी झालेल्या घडामोडींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “तुम्ही मोदीजींच्या नावाने प्रचार केला. आम्ही त्यांच्यादेखत प्रचार केला. त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणालो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी टाकून ते सत्तेवर बसले आहेत”, असा घणाघात त्यांनी केला. “ते म्हणतात, आम्ही वचन मोडलं आहे. मी तुम्हाला आठवण करुन देतो, आम्ही तर शब्दाचे पक्के माणसं. अशाप्रकारे खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये नितीश यांना वचन दिलं होतं. त्यांनी जनादेशानुसार तुमचा मुख्यमंत्री बसवा, असा आग्रह केला. पण आम्ही वचनाला पक्के होतो, आम्ही नितीश यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं”, असं अमित शाह म्हणाले.

मात्र, “महाराष्ट्रात ऑटो रिक्षाची सरकार बनली, ज्याचे तीनही चाकं वेगवेगळ्या दिशेने चात आहेत. एक पूर्व, दुसरा पश्चिम तर तिसरा वेगळ्या दिशेने चालतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाच्या विरोधात सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. जनादेश हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता”, असा दावा त्यांनी केला. “ते म्हणतात एका बंद दराआड चर्चा झालीय. मी वचन दिलेलं. जे आहे ते सर्व सार्वजनिक करतो. मी कधीच खोलसीचं राजकारण केलं नाही. मी तसं कुठलंच वचन दिलं नाही”, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.