नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर
देश बातमी

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियात व्हायरलं झालं. संवेदनशील आणि गोपनिय माहितीची वाच्यता या संवादात करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली असून, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासोबतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुलवामा आणि बालाकोटबद्दलचा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर त्यानंतर देशात प्रंचड गदारोळ सुरू झाला आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून याची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे. या मुद्द्यावरून पुलवामा आणि बालाकोट एअर स्ट्राईकवरून राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांचा आणि उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केला होता. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंत्यंत संवेदनशील विषय असणाऱ्या पुलवामा हल्ला व एअर स्ट्राईकच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती व्हॉटस्ऍप चॅटमधून पुढे आली आहे. पुलवामा हल्ल्याची 4 दिवस आधी तर बालाकोट एअर स्ट्राईक संदर्भात 3 तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामीला माहिती होती. दासगुप्ता यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्यावेळी काहीतरी मोठे घडणार असल्याचा उल्लेख केला आहे.

या सगळ्या घटनांवर त्यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यावेळी काही सवाल मोदी सरकारला केले होते. त्याचबरोबर अजित डोवाल यांची चौकशी करण्याची मागणीही केली होती. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा एक व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

अर्णब आणि दासगुप्त यांच्या व्हॉटस्ऍप चॅटमधल्या गप्पा ?
फेब्रुवारी 2019 ते एप्रिल 2019 या काळात गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यात व्हॉटस्ऍप चॅटद्वारे झालेल्या संवादाचे स्क्रीन शॉट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

पुलवामात हल्ला होण्यापूर्वी चार दिवस आधीच अर्णब गोस्वामीला कश्मीरमध्ये काहीतरी गडबड होणार असल्याची कल्पना होती.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे प्रत्यक्ष दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी फक्त आपल्याच चॅनलचे लोक घटनास्थळी हजर असल्याचा दावा अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.

23 फेब्रुवारी 2019 रोजी दासगुप्ता यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान काहीतरी मोठं घडणार असल्याचं गोस्वामी सांगितलं होतं.

26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोट एअर स्ट्राइक झाला. त्यानंतर दासगुप्ता यांनी एअर स्ट्राइक हीच मोठी घटना ना, अशी विचारणा 27 फेब्रुवारीला व्हॉटस्ऍप चॅट करत केली.