कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही; राहुल गांधींची केंद्रसरकारवर टीका
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही; राहुल गांधींची केंद्रसरकारवर टीका

नवी दिल्ली : ”कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. मात्र केंद्रसरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे.” असा टोला कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लगावला आहे. याचं कारण म्हणजे देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथून कोरोनाचे नवीन स्ट्रेनचे रुग्ण भारतात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ब्राझीलहून परत आलेल्या एका व्यक्तीला ब्राझीलच्या कोरोना व्हायरस स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर भार्गव यांनी या दोन्ही व्हायरस प्रकारांचा संदर्भ घेत सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म डिसेंबरच्या मध्यावधीत प्रथम आढळला.

याबाबत बोलताना ICMR चे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, भारताबाहेरहून आलेल्या सर्व प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची तपासणी केली गेली जाणार आहे आणि त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले गेले आहे. ‘आयसीएमआर-एनआयव्ही’ या चार बाधित लोकांच्या नमुन्यांमधून दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म वेगळा करण्याचा आणि इतर माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म 44 देशांमध्ये पसरला आहे. ब्राझीलचा विषाणूचा प्रकार जानेवारीमध्ये आढळला होता आणि तो आतापर्यंत 15 देशांमध्ये पसरला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ब्रिटनच्या नव्या कोरोना स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 187 झाली आहे. यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नवीन स्वरुपाचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. तसेच, ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. संक्रमित लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.