जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण
राजकारण

जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण

नवी दिल्ली : “जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! म्हणजे सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरी. या लसिना मंजुरी मिळाल्यामुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळनार आहे. या मोहीमेसाठी जीव तोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती दिल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असं मोदींनी या क्षणाचं वर्णन केलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी कोविड योध्याचे देखील कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कठीण परिस्थितीममध्ये असाधारण सेवाभावासाठी आम्ही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि सर्व करोना योद्ध्यांच्याप्रती कृतज्ञता व्यकत करतो आहे. देशवासियांचे जीवन वाचवण्यासाठी आम्ही सैदव त्यांचे आभारी राहू.”

“ही अभिमानाची बाब आहे की ज्या दोन लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती दिली गेली आहे, त्या दोन्ही लसी मेड इन इंडिया आहेत. हे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांची इच्छाशक्ती दर्शवते. तो आत्मनिर्भर भारत, ज्या आधार आहे – सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया…” असं देखील मोदी यांनी नमूद केलं.