अण्णांचा ठाकरे सरकारला दिला इशारा; पुन्हा उपोषणाला बसणार
राजकारण

अण्णांचा ठाकरे सरकारला दिला इशारा; पुन्हा उपोषणाला बसणार

नगर : हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा लागू करावा, या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जनतेकडे सर्वाधिकार मिळाल्याने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा खूप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे. जनतेने जर मुख्यमंत्री, आमदार, अधिकारी यांच्याविरोधात सक्षम लोकायुक्ताकडे पुरावे दिले तर त्यांची चौकशी करून कारवाई करतील इतका प्रभावी व सक्षम असा हा कायदा आहे. परंतु राज्य सरकार त्याकडे चालढकल करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

आम्ही 2011 पासून आंदोलन करत आलोय. भाजपच्या काळात सुद्धा आंदोलन करण्यात आले आहे. या सरकारला लोकपाल व लोकायुक्त कायदा आणण्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे या सरकारला तीन महिन्याचा कालावधी देत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात वयाच्या 85 व्या वर्षी सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी राज्य सरकार विरोधात उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.