ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा
राजकारण

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसला आहे. पक्षाचे मोठे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ममता बॅनर्जींना हा मोठा दणका असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्यानं, ते भाजपमध्ये जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे भाजपकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपनं त्याचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर त्यांना भाजपमध्ये येण्याचंही आवाहनही केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार भाजपमध्ये येणार असल्याचा दावा केला होता. सौगत रॉय यांच्यासह पाच खासदार तृणमूलचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.