गृहमंत्र्यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या दिल्यात हटके शुभेच्छा; तुम्हालाही येईल हसू
राजकारण

गृहमंत्र्यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या दिल्यात हटके शुभेच्छा; तुम्हालाही येईल हसू

मुंबई : केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमीत्त राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हे मात्र नक्की !

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी ! बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी ! पण, आज दिवस आहे जल्लोषाचा कारण वाढदिवस आहे भारी कवीचा ! युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग ! आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अशा प्रकारचे ट्वीट अनिल देशमुख यांनी केले आहे.

बाहेर थंडी पडली असून तुम्ही मांडी घालून बसा. रात्री बाहेर फिरु नका कारण संचारबंदी लागू आहे. पण आज जल्लोषाचा दिवस आहे कारण भारी कवीचा वाढदिवस आहे. त्यांनी युतीसोबत विकासाचा चंग बांदला असून आठवले साहेब राजकारणातील दबंग कवी आहेत. आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! असे देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रिय मंत्री रामदास आठवले हे सातत्याने कविता करत असतात त्यामुळे देशमुख यांनी त्यांना त्यांच्याच शैलीत शुभेच्छा दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.