धक्कादायक ! भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम
राजकारण

धक्कादायक ! भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम

नवी दिल्ली : पाच राज्यांसह आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ समोर आला असून ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. ज्या गाडीत ईव्हीएम मशील सापडले ती गाडी भाजप उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे. ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजप उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजप उमेदवाराची असल्याचं कळालं, असं आयोगाने सांगितलं आहे.

https://twitter.com/atanubhuyan/status/1377684745023221765

लोकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी. या प्रकरणी निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.