प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की
राजकारण

प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की

लखनौ : उत्तरप्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की होत असल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. लखीमपूर खेरीला प्रियंका गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रियंका गांधी यांना हरगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा हात पोलिसांनी मुरडल्याचा आरोप केला आहे. आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. प्रियंका गांधी आज तिकुनियातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी जाणार होत्या. मात्र, आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यात झालेल्या संघर्षामुळे प्रियंका यांना लखनौमध्येच रोखण्यात आलं. त्यांनानंतर त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं. मात्र, त्यांनी पायी घरातून बाहेर पडत चालायला सुरुवात केली आणि नंतर कारमधून पुढे निघाल्या.

https://twitter.com/INCUttarPradesh/status/1444827893498929153

यूपी काँग्रेसच्या ट्विटर हँडलनुसार, लखनौहून लखीमपूर खेरीच्या मार्गावर टोल प्लाझावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि पोलिस रस्त्यावर ट्रक उभे करून कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींना रोखत होते. त्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या यूपी पोलिसांच्या आदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, मी घराबाहेर पडून गुन्हा करत नाही. मला फक्त प्रभावित कुटुंबांना भेटायचे आहे आणि त्यांचे दुःख समजून घ्यायचे आहे. मी काय चूक करत आहे? आणि जर मी काही चूक केली असेल, तर तुम्हाला (यूपी पोलीस) ऑर्डर, वॉरंट असायला हवे. तुम्ही मला थांबवत आहात, पण कोणत्या कारणासाठी? असा प्रश्न त्यांनी केला.