माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका, तपासातून सत्य बाहेर येईल; संजय राठोड
राजकारण

माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका, तपासातून सत्य बाहेर येईल; संजय राठोड

पोहरादेवी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज वाशीम येथे पोहरा देवीचे दर्शन घेतली. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांच्या सोबत होते. या प्रकरणात नाव आल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल येत होते. तब्बल 15 दिवसांनंतर पूजा चव्हाण संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांच्यावर झालेले सगळे प्रयत्न फेटाळताना माझं राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले की, “पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूवरुन माझ्यावर जे आरोप झाले त्यात कोणतंही तथ्य नाही. माझ्यावर नाहक आरोप केले गेले आहेत. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातली आहे. तिच्या मृत्यूचं आम्हालाही दु:ख आहे.आम्ही पूजाच्या कुटुंबीयांसोबत आहोत. मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे. चौकशीतून सगळं बाहेर येईल”,

“माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका. तपासातून सत्य बाहेर येईल, असं ते म्हणाले. तसंच एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हातजोडून केली. गेल्या 15 दिवसांपासून विविध माध्यमांद्वारे जी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला ती आता थांबवा कारण चौकशीतून सगळे काही समोर येईल, अशी कळकळीची विनंती त्यांनी हात जोडून केली.”

संजय राठोड पुढे म्हणाले की, “पूजा चव्हाण हिचा पुण्यात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी आणि माझा समाज सहभागी आहे. परंतु महाराष्ट्रात या सगळ्या प्रकरणावरुन घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. मी मागासवर्गीय कुटुंबातून, भटक्या विमुक्त कुटुंबातून ओबीसीचं नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आहे. गेल्या 30 वर्षांचं माझं राजकीय आणि सामाजिक काम उद्धवस्त करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून झालं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं.”