धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत ६५० नव्या कोरोना बाधितांची नोंद; रुग्णसंख्या वाढ दुप्पट
कोरोना इम्पॅक्ट

धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत ६५० नव्या कोरोना बाधितांची नोंद; रुग्णसंख्या वाढ दुप्पट

पुणे : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगाने वाढ होऊ लागली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. सोमवारी 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने येत्या काही दिवसांत पुण्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महापालिकेला मिळालेल्या अहवालानुसार, पुण्यात आज दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले. यामध्ये संध्याकाळपर्यंत आणखी काही रुग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (22 फेब्रुवारी) फक्त 328 कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यांनतर फक्त एका दिवसात दुप्पट म्हणजेच तब्बल 650 नव्या बाधितांची येथे नोंद केली गेली. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे शहरात मंगळवारी ४ हजार ६०६ जणांची तपासणी करण्यात आली. या आकडेवारीवरुन पुण्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

तर, पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले,” दुपारी ३ पर्यंत ६५० पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत. पुणे शहरात रविवारी ६३४ वर गेलेला नव्या कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी निम्म्याच्या आसपास म्हणजेच ३२८ वर आली होती. हे शहरासाठी दिलासादायक चित्र असले तरी कोरोना संशयितांचे प्रमाण चार हजाराच्या पुढे गेले आहे. फक्त एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्यामुळे आरोग्य प्रशासन धास्तावले आहे. येथे आगामी काळात आणखी कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर, पुणे शहरात आजपर्यंत ११ लाख ०३ हजार ५४८ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९८ हजार २९२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९० हजार ५६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी ७ जण पुण्याबाहेरील आहेत.

दरम्यान, पुण्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी 28 फेब्रवारी पर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अभ्यासिका सुरु असल्या तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आहे. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोनावर जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी ते येथील आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पिंपरी चिंचवड शहरात संचारबंदीची घोषणा केली आहे.