माजी उपमुख्यमंत्र्यांचा पुतण्या राष्ट्रवादीला बगल देत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारण

माजी उपमुख्यमंत्र्यांचा पुतण्या राष्ट्रवादीला बगल देत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची निश्चित झाले आहे. 28 जानेवारी रोजी ते आपल्या समर्थकांसह मुंबईतील काँग्रेस भवनात धवलसिंह मोहिते पाटलांचा प्रवेश सोहळा होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहे. मुंबईतील काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहे.

धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटलांपासून दूर आहे. विजयसिंह यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हात दाखवून भाजपच्या मंचावर जाऊन पोहोचले होते. तसंच त्यांचा मुलगा रजणतिसिंह यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय अंतर दुरावले होते. एकीकडे विजयसिंह मोहितेंनी जाहीरपणे भाजपला मदत केली होती. तर धवलसिंह यांनी मात्र राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हालचाल केली होती. परंतु, धवलसिंह शेवटी काँग्रेसच्या गळाला लागले. धवलसिंह मोहिते यांच्या रुपाने सोलापूरमध्ये काँग्रेसला तरुण चेहरा मिळणार आहे. मोहिते पाटलांच्या घराण्यातील सदस्य काँग्रेसमध्ये येणार असल्यामुळे सोलापुरातील राजकारण आता ढवळून निघणार आहे.