INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक
क्रीडा

INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लीड्स येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात भारत केवळ ७८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ६१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर हसीब हमीदची साथ देण्यासाठी डेव्हिड मलान फलंदाजीला आला. तो मैदानावर रुळेपर्यंत फिरकीपटू रवींद्र जडेजाने हमीदला बोल्ड केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लंचनंतर मात्र, कर्णधार जो रूट आणि मलान यांनी भारतीय गोलंदाजांना हैराण केले. रूटने आपला दमदार फॉर्म कायम राखत अर्धशतकी पल्ला गाठला तर या मलाननेही संधीचे सोने करत अर्धशतक फलकावर लावले. या दोघांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडची आघाडी दोनशेपार पोहोचवली. मोहम्मद सिराजने मलानचा अडथळा दूर केला. त्याने मलानला पंतकरवी झेलबाद केले. मलानने ११ चौकारांसह ७० धावांची खेळी केली.

चहापानानंतर जो रूटने आपले सलग तिसरे शतक पूर्ण केले. त्याने या कसोटीसह मागील तीन कसोटीत तीन शतके ठोकली आहेत. १०४व्या षटकात त्याने इशांतला चौकार खेचत बॅट हवेत उंचावली.