खासदार संभाजीराजे आक्रमक; ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही,पण…
राजकारण

खासदार संभाजीराजे आक्रमक; ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही,पण…

पुणे : ”ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. तसेच, ‘सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचं मी आतापर्यंत म्हणत होतो. पण आता मला गडबड वाटत आहे, असेही संभाराजेंनी म्हटलंय. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWSचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी भुमिका खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता २५ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यात काहीतरी गडबड होऊ शकते, असा संशय संभाजीराजे यांनी व्यक्त केला. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे. सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. तसेच, सरकारच्या भूमिकेत आता आपल्याला गडबड दिसून येत असल्याचं खळबळजनक वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय.

मराठा समाजाला बहुजन समाजापासून लांब ठेवलं जात आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असं सांगत आर्थिक दुर्बल घटक म्हणून कालच्या बैठकीत आरक्षण दिलं. मग सूपर न्यूमर पद्धतीनं ठरलेलं असताना अचानक EWSचा मुद्दा आला कुठून? असा प्रश्न संभाजीराजेंनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच, सारथीच्या स्वायत्ततेचा मुद्दा वर्षभरापासून सुरु आहे. जर याबाबत निर्णय घेता येत नसेल, तर शाहू महाराजांच्या विचार मानणाऱ्यांनी ही संस्था बंद करावी. आपल्याला शाहू महाजारांचे पाईक म्हणवण्याचा अधिकार उरत नाही, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.