भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना हायकोर्टाकडून दिलासा
राजकारण

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना हायकोर्टाकडून दिलासा

मुंबई : भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नोटीस बजावली होती. या प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र आजची सुनावणी काही कारणानं घेऊ न शकल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज या याचिकेवर सुनावणी काही कारणास्तव होऊ न शकल्यानने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम आहे. ८ मार्चपर्यंत हायकोर्टाकडून खडसे यांना दिलासा मिळाला आहे. भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर 30 डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर राहायचे होते. ते ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु, कोरोनाची लागण झाल्यानंतर अखेरीस 15 जानेवारीला ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.

दरम्यान, एकनाथ खडसे गेल्या ३० डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर होणार होते. जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले होते.

मुंबईतल्या निवासस्थानी २८ डिसेंबर आणि २९ डिसेंबर खडसेंनी आराम केला. मात्र, कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. या चाचणीदरम्यान त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर खडसेंनी ईडीकडे चौकशीला हजर राहण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मागितला होता. खडसेंनी ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता हजेरी लावली आणि सायंकाळी ५.३० वाजता कार्यालय सोडले होते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात येऊन पोहचले आहे. त्यामुळे हे प्रकरण पुद्धे नेमके काय वळण घेणार हे पाहन महत्त्वाचे ठरणार आहे.