राजकारण

भाजपला बसणार मोठा धक्का? दोन खासदारांसहीत २५ ते ३० आमदार सोडणार पक्ष

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील भाजपच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बंगाल भाजपचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे इतर आमदार आणि नेतेही रॉय यांच्या पावलावर पाऊल ठेवत तृणमूलमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुकूल रॉय सतत बंगाल भाजपच्या आमदारांबरोबरच खासदारांसोबतही संपर्कात आहेत. निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा स्वगृही म्हणजेच तृणमूलमध्ये परततील असा अंदाज व्यक्त केला जातेय. यामध्ये अनेक नेते असे आहेत ज्यांनी मुकुल रॉय यांच्यासोबत तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे.

रॉय यांनी स्वत: आपण भाजप आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे. तृणमूलमध्ये आल्यानंतरही मुकुल रॉय हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच बंगाल भाजपमधील काही मोठी नावं तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होतील असं सांगितलं जात आहे. २०१७ साली भाजपमध्ये गेलेल्या मुकुल रॉय यांनी मुलगा शुभ्रांशूसोबत पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. मुकुल रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी लवकरच मुकूल रॉय यांना पक्षातील एखादी मोठी जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *