आता तरी लाज वाटू द्या योगी सरकार; प्रियांका चतुर्वेदींचा योगी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

आता तरी लाज वाटू द्या योगी सरकार; प्रियांका चतुर्वेदींचा योगी सरकारवर हल्लाबोल

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. पीडित मुलीने 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर 30 सप्टेंबर रोजी घाईघाईने कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध मध्यरात्री पीडितेचा मृतदेह जाळण्यात आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सर्व प्रकरणातील आरोपी उच्च जातीचे असल्याने योगी सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात शुक्रवारी सीबीआयने हाथरसच्या कोर्टात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सीबीआयने चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली कलम 325 एसटी कायदा आणि भारतीय दंड संविधान कलम 354 आणि 376 ए, 376 डी आणि 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी यूपीच्या योगी सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले आहे की, “पिडीत कुटुंबाला पाठींबा देण्याऐवजी आरोपीना पाठीशी घालणाऱ्या युपी पोलिस, उत्तरप्रदेश सरकार आणि मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे. हे आपल्या समाजातील दु: खद सत्य आहे, जिथे आरोपींचा बचाव केला जातो. बलात्काराला खोटे ठरवले गेले. पीडितेवर अंतिम संस्कार करण्यासापासून तिच्या कुटुंबाला नकार दिला जातो.”

विशेष म्हणजे, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांचे एक लाजीरवाणी चित्र समोर आले होते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. त्यावरून पीडित कुटुंबाने आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. आरोपींना वाचवण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या उच्च कमांड अधिकाऱ्यांनी पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार झालाच नाही, अशी विधाने केली होती. तसेच, पीडित मुलीसाठी काही भाजप नेत्यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.