जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे, नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
राजकारण

जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे, नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. राणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर रात्री नारायण राणे यांनी ट्वीट केलं आहे. नारायण राणे यांनी ट्वीट करत सत्यमेव जयते असं म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नितेश राणे यांनीही इशारा दिला आहे. त्यांनी अभिनेता मनोज वाजपेयीचा राजनिती चित्रपटातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करताना, आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी, असं म्हणताना दिसत आहेत. तसेच पुढे ते, करारा जवाब मिलेगा, असंही म्हणतात. या व्हिडीओच्या माध्यमातून नितेश राणेंनी मंगळवारी राज्यामध्ये घडलेल्या नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका प्रकरणावरुन विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. रात्री पाऊणच्या सुमारास नितेश यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.