धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट; कारण…
राजकारण

धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट; कारण…

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर आज मुंडे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांच्यासोबत याबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, ”माझ्या जवळच्या लोकांना आमच्या संबंधांबद्दल माहिती आहेत. तसंच कुटुंबालाही या सगळ्याची कल्पना आहे, असं मुंडेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवारांनादेखील याची माहिती असं म्हटलं जातं आहे. अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंना पवारांनी नेमका कोणता सल्ला दिला याची माहिती अद्याप तरी उपलब्ध झालेली नाही. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तथापि, रेणू शर्मा नावाच्या तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. शर्मा यांनी पोलीस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅकमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांची बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलंही आहेत. त्यांची जबाबदारीदेखील मी घेतली आहे, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.