मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही आरएसएस’ची भूमिका
राजकारण

मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही आरएसएस’ची भूमिका

नाशिक : ”मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती. इतकेच नव्हे तर, मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांनी कारावास भोगला, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक येथील कार्यक्रमात बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावं ही संघाची भूमिका होती. आरएसएस विषयी अपप्रचार केला जात होता. संघाची भूमिका नाना नवले यांनी मांडली. इंदिरा गांधी सरकार असताना अनेकांना तुरंगात टाकले गेले. पण संघ विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते खचले नाहीत. संघाचे कार्य व्यक्ती निर्माणाचे कार्य नाना नवले यांनी केले. आपल्या संपूर्ण जीवनात इतरांना देण्याचं काम नाना नवले यांनी केलं, असल्याचंही फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. औरंगाबाद नामांतर प्रकरणात राज्य सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ट्विटर वर संभाजीनगर उल्लेख करायचा आणि जे अधिकारात आहे ते नामांतर करायचे नाही. जे पक्ष सोडून गेले त्यांच्याविषयी काही फरक पडणार नाही. सत्ता असते तिथे लोक जात असतात, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.