महाविकास आघाडीचा दे धक्का; देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
राजकारण

महाविकास आघाडीचा दे धक्का; देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने भाजपातील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा समावेश आहे. हा निर्णय घेऊन ठाकरे सरकारने भाजपाला चांगलाच दणका दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, . देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून आता फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्यात आले आहे, तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तसेच, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांचीदेखील विशेष सुरक्षा नसेल.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची बातमी समोर येताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता त्यांचीदेखील सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतच देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली अशी चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर इतर नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाय दर्जाच्या सुरक्षेची शिफारस केली होती, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा होती.

तथापि, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.