सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा; सरकारच्या बैठकीत निर्णय
राजकारण

सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा; सरकारच्या बैठकीत निर्णय

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच राज्य सरकारकडून सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षासह सरकारमधील काही मंत्र्यांची सुद्धा सुरक्षा कमी केली आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या बैठकमध्ये कोण कोणत्या नेत्यांची सुरक्षा वाढवायची आणि कपात करायची याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा देण्यात आली आहे. याआधी सुद्धा अजित पवार हे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

तर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तर, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना वाय सुरक्षा दिली आहे ती आधी वाय प्लस सुरक्षा होती. तर, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर,दिलीप वळसे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आमदार वैभव नाईक हे नारायण राणे यांचे विरोधक आहे म्हणून त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई, कोल्हापूरमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची सुरक्षा वाढवली आहे.