राजकारण

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी भाजपने केंद्रीय मंत्री तसेच, प्रमुख नेत्यांकडे प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश हे सहप्रभारी असतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपसाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून या राज्यासाठी सत्ताधारी पक्षाने केंद्रीय मंत्र्यांची फौज निवडणूक प्रभारी-सहप्रभारी म्हणून उतरवली आहे. केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान हे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रभारी असतील तर, अनुराग ठाकूर, अर्जुनराम मेघवाल, अन्नपूर्णा देवी, शोभा करंदळजे, खासदार सरोज पांडे, विवेक ठाकूर व माजी मंत्री कॅप्टन अभिमन्यू असे पाच सहप्रभारी असतील. याशिवाय, उत्तर प्रदेशमध्ये पाच संघटना प्रभारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत पंजाबचे निवडणूक प्रभारी असतील, हरदीप पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा सहप्रभारी असतील. उत्तराखंडमध्ये संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना निवडणूक प्रभारी नियुक्त करण्यात आले असून लॉकेट चटर्जी व सरदार आर. पी. सिंह सहप्रभारी असतील. मणिपूरची जबाबदारी भूपेंद्र यादव यांच्याकडे असेल, प्रतिमा भौमिक व आसाममधील भाजपचे मंत्री अशोक सिंघल हे सहप्रभारी असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *