वायरल झालं जी

विराट कोहलीचा किलर लूक व्हायरल; एकदा पाहाच

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या लूक्समुळे फार चर्चेत आला आहे. त्याचा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयपीएल २०२१च्या स्थगितीनंतर विराट आपल्या संघासह म्हणजेच टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वी विराट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ट्विटरवर लोकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी विराटने हा नवीन लूक केल्याचे म्हटले जात आहे. येत्या २ जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी निघणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत क्वारंटाईन कालावधीत असून ते इंग्लंडला पोहोचल्यानंतरही त्यांना ३ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागणार आहे.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने कोरोनाची लस टोचून घेतली. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे विराटने सांगितले होते. विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या पत्नीसह कोरोनाची लस घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत कोरोनायोद्ध्यांचे आभार मानले. याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनीही कोरोनाची लस घेतल्याचे सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *