सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे बक्षिस जाहीर
क्रीडा

सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे बक्षिस जाहीर

नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली असून दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्याऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. याप्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले होते. या प्रकरणातील सुशीलचा साथीदार अजय कुमार याची माहिती देणाऱ्यालाही ५० हजारांचे बक्षिस देण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुशील कुमार आणि त्याचा साथीदार यांच्या शोध आमची पथके घेत आहेत. दोघांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. याच्यानंतरही ते पोलिसांपासून पळत आहेत. त्यामुळे दोघांच्या अटकेसाठी बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे रोख बक्षिस दिल्ली पोलिसांकडून देण्यात येईल, असे दिल्लीच्या डीसीपी उषा रंगनाणी यांनी सांगितले.

पोलिसांनी याआधी सुशील कुमारच्या घरावर छापा टाकला होता, मात्र तो तिथे नव्हता. त्यानंतर पोलिसांनी सुशील कुमार विरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केले होते. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी सुशील कुमारने आधीच अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.