भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
क्रीडा

भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

मुंबई : कसोटी आणि टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 14 सदस्यीय संघाची घोषणा इंग्लंडने केली आहे. या संघाचं नेतृत्व इयन मॉर्गनकडे असेल, तर कोपराच्या दुखापतीमुळे फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर उपचारासाठी इंग्लंडला परतणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूटला वनडे संघात स्थान मिळालेलं नाही. तर लियाम लिव्हिंगस्टोनला पहिल्यांदाच वनडे टीममध्ये संधी देण्यात आली आहे. लिव्हिंगस्टोन इंग्लंडच्या टी-20 टीममध्येही होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तर कव्हर म्हणून जॅक बॉल, क्रिस जॉर्डन आणि डेव्हिड मलानही टीमसोबत राहतील.

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिन्ही वनडे पुण्यात होणार आहेत. पहिली मॅच 23 मार्च, दुसरी मॅच 26 तारखेला आणि तिसरी मॅच 28 मार्चला होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडचा टेस्ट सीरिजमध्ये 3-1 ने आणि टी-20 सीरिजमध्ये 3-2 ने पराभव केला. वनडे क्रमवारीमध्ये इंग्लंडची टीम सध्या पहिल्या क्रमांकावर आहे, पण त्यांना भारताला घरच्या मैदानात हरवणं कठीण जाईल.

असा असेल इंग्लंडचा संघ
इयन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉप्ले, मार्क वूड