गेलचा धमाका : १२चेंडूत अर्धशतक तर २२ चेंडूत ८४ धावा; व्हिडिओ पाहाच
क्रीडा

गेलचा धमाका : १२चेंडूत अर्धशतक तर २२ चेंडूत ८४ धावा; व्हिडिओ पाहाच

अबुधाबी : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज युनिवर्सल बॉस ख्रिस गेलने एक धमाका केला असून सध्या सुरु असलेल्या अबू धाबी टी-१० लीगमध्ये एक तुफानी खेळी केली आहे. गेलने २२ चेंडूत नाबाद ८४ धावांची धडाकेबाज खेळी करत अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/captions_master/status/1357027027099021312

अबू धाबी संघाकडून खेळणाऱ्या गेलने मराठा अरेबियन्स संघाविरुद्ध वादळी खेळीचा प्रत्यय दिला. त्याने धमाकेदार अशी ८४ धावांची खेळी केली आणि संघाला सामना जिंकवून दिला. यात विशेष गोष्ट अशी की त्याच्या ८४ धावांपैकी ७८ धावा या त्याने केवळ चौकार-षटकारांच्या मदतीनेच केल्या. गेलने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ९ षटकार लगावले. त्याने अवघ्या १२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे त्याने टी-१० लीग स्पर्धेत मोहम्मद शहजाद आणि मुहम्मद वासिम यांच्या सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.

मराठा अरेबियन्स संघाने १० षटकांत ४ बाद ९७ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून अलिशान शराफूने २३ चेंडूत ३३ धावांची तर मोहम्मद हाफिजने १३ चेंडूत २० धावांची खेळी केली. ९८ धावांचा पाठलाग करताना अबू धाबीचा सलामीवीर गेलने झंझावाती सलामी दिली. १२ चेंडूत आपले अर्धशतक त्याने पूर्ण केले. त्यानंतरच्या १० चेंडूत त्याने ३४ धावा करत अबू धाबीला विजय मिळवून दिला. अबू धाबीने ९८ धावांचे लक्ष्य अवघ्या ५.३ षटकांत गाठले.