पंतने झळकावले विक्रमी शतक; ५७ वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध झाला हा रेकॉर्ड
क्रीडा

पंतने झळकावले विक्रमी शतक; ५७ वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध झाला हा रेकॉर्ड

अहमदाबाद : भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया अडचणीत सापडली असताना त्यातून संघाला बाहेर काढले आणि शतक झळकावले. गेल्या दोन वर्षापासून पंतला शतकाने हुलकावणी दिली होती. याआधी चार वेळा नर्व्हस ९०मध्ये बाद झालेल्या पंतने यावेळी मात्र षटकारासह शतक पूर्ण केले आणि विक्रम केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतने जानेवारी २०१९ मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर अनेकवेळा शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर देखील तो ते पूर्ण करू शकला नव्हता. आज चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची अवस्था ६ बाद १४६ अशी झाली असताना पंतने मोर्चा संभाळला. त्याने ८४व्या षटकात कर्णधार जो रूटच्या चेंडूवर षटकार मारून करिअरमधील तिसरे शतक झळकावले. पण त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये जेम्स एंडरसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०१ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट ८५.५९ इतका होता.

इंग्लंडविरुद्ध दोन शतक करणारा तो ५७ वर्षानंतरचा दुसरा भारतीय विकेटकीपर ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध दोन शतक करणाऱ्या पंतने माजी क्रिकेटपटू बुधी कुंदरन यांनी १९६४ साली अशी कामगिरी केली होती. पंतने पहिले शतक इंग्लंडविरुद्ध झळकावले होते. पंतने इंग्लंडविरुद्ध २०१८ साली आदिल रशीदच्या चेंडवर षटकार मारून पहिला शतक पूर्ण केले होते. आता २०२१ मध्ये देखील त्याने रूटला षटकार ठोकत शतक पूर्ण केले. घरच्या मैदानावरील हे त्याचे पहिले शतक आहे.

दरम्यान, विकेटकिपर म्हणून कसोटी सर्वाधिक शतकाचा विक्रम एम एस धोनीच्या नावावर आहे. त्याने १४४ डावात ६ शतक केली आहेत. तर साहाने ५० डावात ३ शतक केली आहे. आज पंतने साहाच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने ३३ डावात ३ शतक केली आहेत.