आझम आणि विराटला मागे सोडत डेव्हिड मलानचा विक्रम
क्रीडा

आझम आणि विराटला मागे सोडत डेव्हिड मलानचा विक्रम

अहमदाबाद : भारताविरुद्धच्या पाचव्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव करत भारताने ही सीरिज 3-2 ने जिंकली. इंग्लंडने सीरिज गमावली असली तरी त्यांचा बॅट्समन डेव्हिड मलानच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 1 हजार रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड मलानच्या नावावर झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 224 रन केले. भारताचा इंग्लंडविरुद्धचा हा या फॉरमॅटमधला सर्वाधिक स्कोअर होता. या आव्हानाचा पाठलाग करताना मलान आणि बटलर इंग्लंडला जिंकवून देतील, असं वाटत होतं, पण या दोघांची विकेट पडताच इंग्लंडची बॅटिंग गडगडली, त्यामुळे त्यांना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 188 रनपर्यंत मजल मारता आली.

या मॅचमध्ये 65 वी रन करताच मलानने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. 24 व्या इनिंगमध्येच मलानने हे रेकॉर्ड केलं. मलानच्या आधी हा विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर होता. बाबर आझमने 26 इनिंगमध्ये आणि विराट कोहलीने 27 इनिंगमध्ये 1 हजार रनचा टप्पा पार केला. केएल राहुल आणि एरॉन फिंच यांनी प्रत्येकी 29-29 इनिंगमध्ये 1 हजार रन पूर्ण केले आहेत.