वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला तर कोण असेल विजेता?
क्रीडा

वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला तर कोण असेल विजेता?

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. कोण विजेता होईल, हे निश्चित करण्यासाठी किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका असायला हवी होती, असेही म्हटले जात होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सामन्याच्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती. हा सामना ड्रॉ झाला किंवा अनिर्णित सुटला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने सांगितले आहे. १८ जून ते २२ जून असा हा सामना साऊथम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे होईल. शिवाय, २३ जूनला राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही निर्णय २०१८मध्येच घेतले गेले होते.

सामना ड्रॉ झाला किंवा अनिर्णित सुटला तर विजेता कोण असेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात डोकावत होता. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने या प्रश्नाचे उत्तर दिले असून कोण विजेता होणार या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.