कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?
क्रीडा

कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान पहिला एकदिवसीय सामना उद्या (ता. १८) रविवारी होणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. या दौर्‍यावर शिखर धवन नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रथमच भारतीय संघाचा कर्णधार होणार आहे. एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत २४ खेळाडूंनी भारतासाठी कर्णधारपद भूषवले आहे. धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणारा २५वा खेळाडू ठरणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सामना कधी सुरू होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १८ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल.

सामना कुठे होणार?
हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमादासा स्‍टेडियमवर खेळला जाईल.

सामना कुठे पाहता येईल?
हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्हवर पाहायला मिळेल.

दरम्यान, पृथ्वी शॉ श्रीलंका दौर्‍यावर शिखर धवनबरोबर सलामी देऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीस शॉला कसोटी संघातून वगळण्यात आले. यादरम्यान, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. श्रीलंका दौर्‍यावर मध्यम फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याकडेही सर्वांच्याच नजरा असतील. घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. यजुर्वेंद्र चहलसाठीही श्रीलंका दौरा खूप महत्वाचा आहे. निवड समितीची नजरही त्याच्यावर आहे.

भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकारिया.