आयपीएलच्या लिलावाची ठरली तारीख?
क्रीडा

आयपीएलच्या लिलावाची ठरली तारीख?

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामासाठीची लिलाव लवकरात लवकर होणार आहे. ही प्रक्रिया १८ फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता असून, ठिकाण अद्याप निश्चित झालेले नसले तरी लिलावही चेन्नईत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयपीएलचा आगामी हंगाम भारतात होणार की परदेशात हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र हंगाम होण्याबाबत आशावादी आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२०चा आयपीएल हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत झाला होता.

पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकांद्वारे देशात आयपीएल होण्याबाबतची स्पष्टता येऊ शकेल. तसेच ४ फेब्रुवारीपर्यंत संघांसाठी खेळाडू स्थलांतरण व्यवहार प्रक्रिया सुरू राहील.