आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा धोनी पहिला खेळाडू
क्रीडा

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा धोनी पहिला खेळाडू

चेन्नई : चेन्नईच्या संघाने आयपीएल 2020मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. या कामगिरीमुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका करण्यात आली. पण तरीदेखील चेन्नईने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला यंदा होणाऱ्या हंगामासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवलं. संघात करारबद्ध ठेवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश झाला आणि त्यामुळे महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासात एक पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये १५० कोटींची मिळकत कमावणारा धोनी पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयपीएल 2020पर्यंत धोनीने आयपीएलच्या माध्यमातून १३७ कोटी रुपये कमावले होते. ज्या दिवशी धोनीला चेन्नईने संघात कायम राखले त्या दिवशी धोनीने १५० कोटींचा टप्पा ओलांडला. धोनीला आयपीएल 2021साठी चेन्नईने १५ कोटींना करारबद्ध केले. त्यामुळे त्याची आयपीएलच्या माध्यमातून झालेली एकूण कमाई १५२ कोटी झाली आहे.

२०१८पासून धोनीला प्रत्येक वर्षी चेन्नईकडून एक हंगामाचे १५ कोटी रुपये दिले जातात. आयपीएलच्या पहिल्या हंगामात २००८साली धोनीला ६ कोटींना विकत घेतल होतं. त्यावेळी धोनी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला पुढील ३ वर्षे समान रक्कम मिळत होती. त्यानंतर २०११ ते २०१३ दरम्यान त्याला प्रत्येक हंगामात ८.२८ कोटींचे मानधन मिळत होतं. २०१४ ते २०१७ ही रक्कम प्रत्येक हंगामासाठी १२.५ कोटी इतकी होती.

महेंद्रसिंह धोनी आयपीएल कमाईत रोहित विराटपेक्षा सरस आहे. रोहित शर्माचं एका हंगामाचं मानधन विराटपेक्षा २ कोटींनी कमी आहे. पण आयपीएल सुरू झाल्यापासून आतापर्यंतची कमाई पाहता रोहित त्याच्यापेक्षा सरस आहे. रोहित शर्माचं एका हंगामाचं सध्याचं मानधन १५ कोटी इतकं आहे. पण त्याची आयपीएलमधील एकूण कमाई १४६.६० कोटी इतकी आहे. तर विराटचं एका हंगामातील मानधन सध्या १७ कोटी आहे, पण आयपीएलमधील त्याची एकूण कमाई ही १४३.२० कोटी इतकीच आहे.