पदार्पणाच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा मोठा विक्रम
क्रीडा

पदार्पणाच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा मोठा विक्रम

पुणे : भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. 25 वर्षीय कृष्णाने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये कृष्णाचे नाव घेतले जाणार आहे. या प्रकरणात त्याने माजी क्रिकेटर नोएल डेव्हिड यांचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.1997 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना डेव्हिड यांनी 21 धावा देऊन 3 बळी घेतले होते. तर, काल मंगळवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात कृष्णाने 8.1 षटकात 54 धावा देत 4 बळी टिपले.

सुरुवातीच्या काही षटकांमध्ये महागडा ठरलेल्या कृष्णाने सामन्याच्या उत्तरार्धात चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबुचा मार्ग दाखवला. त्याने प्रथम जेसन रॉयला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्यानंतर दोन षटकांत बेन स्टोक्सची विकेट घेतली. शेवटच्या स्पेलमध्ये त्याने सॅम बिलिंग्ज आणि टॉम करनला बाद केले. या कामगिरीसह तो या सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला.