शास्त्री गुरुजींचे धोनी पंतवरील ते ट्विट जोरदार व्हायरल
क्रीडा

शास्त्री गुरुजींचे धोनी पंतवरील ते ट्विट जोरदार व्हायरल

मुंबई : आयपीएल2021चा आज दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात होत आहे. एकीकडे अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे, तर दुसरीकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणवला जाणारा ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे. सर्वांना या द्वंद्वाची उत्सुकता लागली होती. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या उत्सुकतेपोटी एक भन्नाट ट्विट केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुरू वि. चेला, खूप मजा येईल, स्टम्प माइक ऐकत राहा, असे ट्विट रवी शास्त्रींनी केले असून पंत आणि धोनी हे खेळाडू सामन्यादरम्यान यष्टीमागे अनेकदा गमतीशीर वक्तव्य करतात. हे सर्व स्टम्प माइकमधून चाहत्यांना ऐकायला मिळते. त्यामुळे शास्त्रींनी हे ट्विट केले आहे.

दोन यष्टीरक्षक कर्णधार असलेले महेंद्रसिंह धोनी आणि ऋषभ पंत यांच्या रणनितीकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून आहे. ऋषभ पंत पहिल्यांदाच कर्णधारपदाच्या भूमिकेत मैदानात उतरला आहे. ऋषभ पंतकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. तर धोनी आदर्श असल्याचे पंतने वारंवार सांगितले आहे. दुसरीकडे कर्णधारपद यशस्वीरित्या भूषवलेल्या धोनीकडे अनुभवाची शिदोरी आहे. त्यामुळे कोण कुणावर भारी पडणार याची उत्सुकता लागली आहे.