युवराजचा पुन्हा धमाका; एकाच ओव्हरमध्ये चार षटकार
क्रीडा

युवराजचा पुन्हा धमाका; एकाच ओव्हरमध्ये चार षटकार

मुंबई : भारताचा माजी धडाकेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंगने पुन्हा धमाका केला असून युवराजने एकाच ओव्हरमध्ये चार षटकारांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले आहे. युवराजच्या या फलंदाजीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या रोड सेफ्टीसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होता. या सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी होती. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने यावेळी संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. सचिनने यावेळी फक्त ३७ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली. पण सचिन बाद झाल्यावर मैदानात युवराज सिंगचे वादळ घोंघागवल्याचे पाहायला मिळाले.

युवराजने यावेळी सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. यावेळी जुना युवराज पुन्हा मैदानात परतल्याचे पाहायला मिळाले होते. कारण यावेळी युवराजने एकाच षटकात तब्बल चार षटकार लगावले. त्यामुळे चाहत्यांना युवराजने दक्षिण आफ्रिकेत एकाच ओव्हरमध्ये खेचलेल्या सहा षटकारांची आठवण झाली. युवराजने या सामन्यात फक्त २२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५२ धावांची तुफानी खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. सचिन आणि युवराज या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना दोनशे धावांचा टप्पा गाठता आला. भारतीय संघाने यावेळी २० षटकांमध्ये फक्त तीन फलंदाज गमावत २०४ धावा केल्या.