माझा दुसऱ्यांदा घटस्फोट… शिखर धवनच्या पत्नीची घटस्फोटानंतर पोस्ट
क्रीडा

माझा दुसऱ्यांदा घटस्फोट… शिखर धवनच्या पत्नीची घटस्फोटानंतर पोस्ट

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखर धवन आणि पत्नी आयेशाने घटस्फोट घेतला आहे. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिच्यावर दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे. आयेशाने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये आयेशा मुखर्जीने घटस्फोटासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जोपर्यंत मी दोन वेळा घटस्फोटित झाले नाही तोपर्यंत घटस्फोट हा खूप घाणेरडा शब्द असल्याचं मला वाटत होतं. शब्दांचे इतके शक्तिशाली अर्थ आणि संगती असू शकते हे मजेशीर आहे. मी घटस्फोटित म्हणून पहिल्यांदा याचा अनुभव घेतला. जेव्हा पहिल्यांदा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. त्यावेळी मला मी खूप काही चुकीचं करत असल्याचं वाटत होतं, असं आयेशाने म्हटलं आहे.

पोस्टमध्ये पुढे तिने म्हटलं आहे की, मग आता विचार करा, मला दुसऱ्यांदा यामधून जावं लागत आहे. हे भयानक आहे. याआधीही माझा घटस्फोट झाला असून दुसऱ्या वेळी माझं खूप काही पणाला होतं असं वाटत होतं. मला खूप काही सिद्ध करायचं होतं. पण जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हाही भीती वाटली. पहिल्यांदा ज्या भीती, अपयश आणि निराशा या भावना होत्या त्या पुन्हा तशाच आल्या. दरम्यान यावेळी आयेशाने आपल्या अजून सबल झाल्यासारखं वाटत असल्याचंही म्हटलं आहे. नऊ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर शिखर आणि आयेशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.