Tokyo Paralympics : भारताला आणखी एक सुवर्ण; कृष्णा नागरची ऐतिहासिक कामगिरी
क्रीडा

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक सुवर्ण; कृष्णा नागरची ऐतिहासिक कामगिरी

टोक्यो : पॅरालिम्पिकच्या समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आणखी एका सुवर्ण पदकाची कमाई केली असून पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रौप्यपदक जिंकल्यानंतर कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं आहे. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १९ हा विक्रमी आकडा गाठला आहे. यंदा पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे. कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याआधी सुहास यशिराजने समारोपाच्या दिवशी रौप्यपदक जिंकलं. सुहासला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. सुहास यथिराज आयएएस अधिकारी असून टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे. सुहास यथिराज पदक जिंकणारा पहिला आयएएस अधिकारी ठरला आहे. अंतिम सामन्यात सुहास यशिराजसमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचं आव्हान होतं. याआधी सुहासने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९, २१-१५ अशा ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवला होता.

अंतिम सामन्यात फ्रेडी सेटियावानने सुहास यथिराजचा पराभत करत सुवर्णपदक जिंकलं. तर सुहास यथिराजे रौप्यपदकाची कमाई केली आहे. कर्नाटकमध्ये जन्म झालेला सुहास यथिराज उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहे.