राजकारण

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा

चंदीगढ : पंबाजमध्ये काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. आज सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये दिवसभरातला काँग्रेसला हा दुसरा धक्का असून महिला कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी १८ सप्टेंबर रोजी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चरणजीतसिंग चन्नी […]

राजकारण

पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप; नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

चंदीगढ : पंजाबमधील राजकीय घडामोडी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा सोपवलेला असताना, आता पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा […]

राजकारण

चरणजित सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शपथ

चंदीगढ : चरणजित सिंग चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू […]

राजकारण

चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

चंदीगढ : काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. आज दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा […]

राजकारण

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांचं खळबळजनक विधान

चंदीगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला. यानंतर त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविषयी आता केलेलं विधान चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात खटके उडताना दिसत आहे. अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबर रोजी सांगितले की, […]

राजकारण

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

चंदीगढ : पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन […]

देश बातमी

प्रदेशाध्यक्षांच्या नावे ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून काँग्रेस कार्यकर्त्याची आत्महत्या

चंदीगढ : पंजाबमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याने पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाने ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करुन आत्महत्या केली आहे. लुधियाना जिल्ह्यातील जंगपूर गावात ही घटना घडली. दलजीत सिंग हॅप्पी (42) असं या मृत व्यक्तीं नाव आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दलजीतसिंग हॅप्पी यांचा प्रीतम सिंगसोबत मालमत्तेसाठी वाद झाला होता. या […]

देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

देश बातमी

जगातील सर्वात वृद्ध महिलेचा मृत्यू; हे होतं दीर्घायुष्याचं गुपित

मोहाली : जगातील सर्वात वृद्ध महिलेचा अखेर 16 एप्रिल 2021 रोजी मृत्यू झाला. वयाच्या 119व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या महिलेचे नाव बच्चन कौर असे असून ती पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील कसबा बनुडमधील मोटे माजरा या खेड्यातील रहिवासी होती. बच्चन कौरची अंत्ययात्रा बँड-बाजा वाजवत काढण्यात आली. संपूर्ण कुटुंबासह गावातील नागरिक बच्चन कौर यांना मानाने निरोप […]

कोरोना इम्पॅक्ट

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; तरच दिल्लीत या…

देशातील काही राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची झपाटयाने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने करोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रास पाच राज्यातून […]