राजकारण

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आज (ता. १५) चक्क बोट चालवत शिवसेनानेते आणि नगरविकसामंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं होतं. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना उदयनराजेंनी निसर्गाबरोबरच राजकीय टोलेबाजी केल्याचंही पहायला मिळालं. उदयनराजेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी जाताना बोटीने प्रवास केला. बोटीतील […]

राजकारण

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे. या आंदोलनात […]

राजकारण

भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री

अहमदाबाद : पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील याच नेतृत्वबदलानंतर आता पुन्हा भाजपाशासित राज्यामध्ये नेतृत्व बदल होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलल्याच्या चर्चांणा वेग आला आहे. […]

राजकारण

भाजपचे उद्या सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपकडून उद्या (ता. १५) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे […]

राजकारण

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले, मी भाजपची पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नसल्याचे […]

राजकारण

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी भाजपने केंद्रीय मंत्री तसेच, प्रमुख नेत्यांकडे प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश हे सहप्रभारी असतील. भाजपसाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून या राज्यासाठी सत्ताधारी पक्षाने […]

देश बातमी

माकडांच्या भितीने भाजपनेत्याच्या पत्नीची दुसऱ्या मजल्यावरुन उडी; जागीच मृत्यू

शामली : माकडांपासून वाचण्याच्या नादात उत्तर प्रदेशमधील शामली येथील कैरानामधील भाजप नेत्याच्या पत्नीचा दूर्देवी मृत्यू झालाय. घरातील काहीतरी काम असल्याने भाजप नेत्याची पत्नी घराच्या गच्चीवर गेली होती. मात्र, त्याच वेळेस आजूबाजूच्या झाडांवरुन माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. माकडांपासून वाचण्यासाठी या महिलेने थेट दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू […]

राजकारण

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष

पुणे : भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात आता पुणे महापालिकेत आम आदमी पक्षाने दंड थोपटले आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला […]

राजकारण

भाजपला मोठा झटका; आणखी एका आमदाराने दिली सोडचिठ्ठी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक आमदार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. भाजपचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी सेनेटर हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदारांची संख्या ७२ झाली आहे. सोमवारी विष्णुपूरच्या भाजप आमदाराने […]

कोकण बातमी

मोठी बातमी! नारायण राणेंना विजेचा शॉक

कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशीर्वाद यात्रेदरम्यान एके ठिकाणी हाताला विजेचा शॉक लागला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू केल्यानंतर केंद्रीय मंत्री राणे आज सिंधुदर्गातील कणकवली येथे दाखल झाले. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते तेथून निघत होते. आसपास मोठी गर्दी […]