सध्याच्या राज्यपालांनी केलेला हा चमत्कार दुर्दैवी : शरद पवारांचा राज्यपालांवर निशाणा 
राजकारण

सध्याच्या राज्यपालांनी केलेला हा चमत्कार दुर्दैवी : शरद पवारांचा राज्यपालांवर निशाणा 

बारामती : “राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्य सरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेनं दिलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे,” असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष […]

Farmer Protest : हिंसेनं समस्या सुटू शकत नाही; राहुल गांधींचं शांततेचं आवाहन
राजकारण

शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण; राहुल गांधीचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली : “देशाच्या सीमेवर ज्यांची मुलं आपला जीव अर्पण करतात, त्यांच्यासाठी दिल्लीच्या सीमेवर खिळे अंथरले आहेत. अन्नदाता अधिकार मागत आहे, सरकार अत्याचार करत आहे!” अशा शब्दात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या […]

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही; उद्धव ठाकरे
राजकारण

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही; उद्धव ठाकरे

मुंबई : ”केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मराठी काय भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?, असे अनेक प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केले. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या निर्धार बोलून दाखवला होता. […]

म्हणून देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली; डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रावर टीका
राजकारण

म्हणून देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली; डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, अशी सणसणीत टीका देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केंद्र सरकारवर केली आहे. तसेच, असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे. मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंह यांनी यावेळी केला. केरळमध्ये राजीव […]

घरगुती गॅस दरवाढीवरून रुपाली चाकणकरांचा पारा चढला; थेट मोदी सरकारवरच साधला निशाणा
राजकारण

घरगुती गॅस दरवाढीवरून रुपाली चाकणकरांचा पारा चढला; थेट मोदी सरकारवरच साधला निशाणा

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. अशातच आता गृहिणींचेही बेज्त पूर्णपणे कोलमडणार असल्याचं दिसत आहे. याच कारण म्हणजे चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. या कारणास्तव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत केंद्रातील मोदी सरकारवर […]

समलैंगिक विवाह हा काही मूलभूत अधिकार नाही: केंद्र सरकार
देश बातमी

समलैंगिक विवाह हा काही मूलभूत अधिकार नाही: केंद्र सरकार

नवी दिल्ली : भारतात अद्यापही समलैंगिक विवाहांना मान्यता मिळाली नाही. भारतीय दंड संहिता कलम 377 नुसार समलैंगिक विवाह हा अपराध मानण्यात येत होता, त्यासाठी दहा वर्षाची शिक्षेची तरतूद होती. पण 6 सप्टेंबर 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने ”समलैंगिक विवाह हा अपराध नाही,” असा एक ऐतिहासिक निकाल दिला. त्यानंतर समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी अशी एक याचिका दिल्ली […]

तर… भारतात WhatsApp बंद होणार? 
लाइफफंडा

तर… भारतात WhatsApp बंद होणार? 

भारतात दिवसेंदिवस सोशल मिडीयाचा वापर वाढताना दिसत आहे. मात्र सोशल मिडीयाचा चुकीच्या पद्धतीने वापरही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाची सूचना केली आहे. सोशल मीडियासाठीच्या मार्गदर्शन सूचनांपैकी ही एक महत्वाची सूचना आहे. ती म्हणजे सोशल मीडियावर एखादा गैरप्रकार घडल्यास त्याची सुरुवात कुणी केली याची माहिती कंपनीला द्यावी लागेल. सरकारची हीच सूचना WhatsApp साठी […]

केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढतयं: नाना पटोलेंचा आरोप
राजकारण

केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढतयं: नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी रोजी एका वेबीनारमध्ये बोलताना चार धोरणात्मक क्षेत्रे वगळता सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते. या मुद्यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रातील सरकार देशातील सर्व सरकारी उद्योग परस्पर विकत आहे. हे असं करता येत […]

मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार कोरोना लस
कोरोना इम्पॅक्ट

मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार कोरोना लस

नवी दिल्ली : देशभरात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. येत्या १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. यात 60 […]

राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका; देशाला विकणारेच क्रॉनीजीवी
राजकारण

पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किमतींवरून राहुल गांधींची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतींमुळे केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी ट्वीटरवर एक शेर लिहित केंद्रासरकारवर टीका केली आहे. ”वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं!” असे म्हणत त्यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. तथापि, आजच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत पेट्रोलचे दर […]