विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर
क्रीडा

विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर

लीड्स : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणाऱ्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटीतील सामन्यात एक विचित्र घटना शुक्रवारी घडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत मैदानाबाहेर काढलं. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणं अपेक्षित असतानाच भारतीय संघाचा एक इंग्लीश चाहता हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे […]

लाजिरवाणी गोष्ट; तब्बल ४७ वर्षानंतर भारतीय संघ अपयशी
क्रीडा

लाजिरवाणी गोष्ट; तब्बल ४७ वर्षानंतर भारतीय संघ अपयशी

लीड्स : भारतीय संघ लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांवर बाद झाला. भारतीय संघाचा एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने १८ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. याआधी १९७४ मध्ये लॉर्ड्स कसोटीत भारत ४२ आणि १९५२ मध्ये मँचेस्टरमध्ये ५८ धावांवर […]

लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
क्रीडा

ऐतिहासिक विजयाने कोहलीच्या नावावर विराट विक्रमाची नोंद

लॉर्ड्स : दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाने कसोटीत इंग्लंडला पराभूत करण्याची ही तिसरीच वेळ आहे. महेंद्रसिंह धोनीच्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर शेवटच्या वेळी ९५ धावांनी विजय मिळवला होता. यापूर्वी भारताने १९८६मध्ये लॉर्ड्सवर प्रथमच विजय मिळवला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर भारत जिंकला. […]

लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!
क्रीडा

लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!

लॉर्ड्स : कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. मोहम्मद शमी, जसप्रीत […]

इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला डवचलं; मग विराटनं बाल्कनीतूनच दिल्या शिव्या
क्रीडा

इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला डवचलं; मग विराटनं बाल्कनीतूनच दिल्या शिव्या

लॉर्ड्स : लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस असून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल करत भारताला तारले. या दोघांनी नवव्या गड्यासाठी नाबाद ७७ धावांची भागीदारी उभारली आणि इंग्लंडसमोर २७२ धावांचे खडतर आव्हान ठेवले. फलंदाजी करताना इंग्लंडच्या जसप्रीत बुमराहला इंग्लंडच्या खेळाडूंनी स्लेज केले. मार्क वूड, जोस बटलर, कर्णधार जो रूट यांनीही बुमराहवर तोंडसुख […]

ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश
क्रीडा

जानेवारी २०२२ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रम; असे असेल नियोजन

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचे व्यस्त वेळापत्रक समोर आलं आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने स्पर्धाची एका पाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे. क्रिकेट स्पर्धाचं हे व्यस्त वेळापत्रक पाहिलं तर खेळाडूंची चांगलीच […]

भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी; न्यूझीलंडकडे कसोटी अजिंक्यपदाची पहिली गदा
क्रीडा

भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी; न्यूझीलंडकडे कसोटी अजिंक्यपदाची पहिली गदा

साऊदम्पटन : कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाने भारताला हुलकावणी दिली. जगजेतेपदाची गदा उंचावण्यात २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय प्रकाराचे विश्वचषक निसटलेल्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला यश आले. २०१४ची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर तिसऱ्यांदा भारताला जागतिक विजेतेपदाने हुलकावणी दिली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने भारताचा दुसरा डाव १७० धावांत […]

कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे
क्रीडा

दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे केवळ ६५ षटकांचा खेळ; भारत सुस्थितीत!

साऊदम्पटन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने १२४ चेंडूंत नाबाद ४४ धावा केल्याने भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत सुस्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ३ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे ६४.४ षटकांनंतर खेळ होऊ शकला नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. रोहित शर्मा […]

जडेजाचा खास विक्रम; धोनी-कोहलीच्या सोबत मिळालं स्थान
क्रीडा

विराट कोहलीने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला जात असताना विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतासाठी सर्वाधिक वेळा कर्णधारपद भूषविण्याचा मान त्याला मिळाला आहे. विराट कोहलीने ६१ कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने ६० सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. […]

या पाकिस्तानी महिलेने केली भारताकडे विराटची मागणी; फोटो पाहाच
वायरल झालं जी

या पाकिस्तानी महिलेने केली भारताकडे विराटची मागणी; फोटो पाहाच

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा विराट कोहलीची जबरदस्त फॅन असलेल्या पाकिस्तानी महिलेने भारतीय संघाकडे विराटचीच मागणी केली आहे. तिचे नाव रिजला रेहान आहे. ती 2019मध्ये चांगलीच चर्चेत आली होती. रिजला रेहान 2019 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळी इंग्लंडमध्ये उपस्थित होती. त्यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये मला विराट द्या. प्लीज मला विराट द्या अशी मागणी केली […]