निलेश राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र; परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की…
राजकारण

निलेश राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र; परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की…

मुंबई : ”ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी अडकलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात. कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘, असे ट्विट करत भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा […]

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत; निलेश राणेंचा घणाघात
राजकारण

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत; निलेश राणेंचा घणाघात

मुंबई : मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:लाच क्लीन चीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढलं. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, अशी घणाघाती टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिएलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. […]

पोहरादेवी जगदंबाचे महंत कबिरदास यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

पोहरादेवी जगदंबाचे महंत कबिरदास यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण

वाशिम : दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली […]

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर आशिष शेलारांचा टोला ; गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही
राजकारण

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर आशिष शेलारांचा टोला ; गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही

मुंबई : “कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही,” असा टोला लगावत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने चर्चेत आलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी (ता. २३) वाशिम येथील पोहरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी […]

माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका, तपासातून सत्य बाहेर येईल; संजय राठोड
राजकारण

माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका, तपासातून सत्य बाहेर येईल; संजय राठोड

पोहरादेवी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज वाशीम येथे पोहरा देवीचे दर्शन घेतली. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांच्या सोबत होते. या प्रकरणात नाव आल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल येत होते. तब्बल 15 दिवसांनंतर पूजा चव्हाण संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. […]

संजय राठोडांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा; प्रवीण दरेकरांची मागणी
राजकारण

संजय राठोडांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा; प्रवीण दरेकरांची मागणी

वाशिम : एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले […]

पोहरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; कोरोना संकटाचा समर्थकांना विसर
राजकारण

पोहरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; कोरोना संकटाचा समर्थकांना विसर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. मात्र त्यातच १५ दिवसांनी संजय राठोड हे सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत. संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीच्या दर्शनाला […]

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन
बातमी विदर्भ

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीच्या दर्शनाला रवाना झाले. शासकीय वाहनांऐवजी स्वतःची लॅन्ड क्रूझर या खासगी गाडीतून त्यांनी प्रवासाला सुरवात केली, […]

संजय राठोड नॉट रिचेबल नाहीत; अजित पवारांचे स्पष्टीकरण
राजकारण

संजय राठोड नॉट रिचेबल नाहीत; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारणात ढवळून निघाले आहे. अशातच या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशातच संजय राठोड नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु, संजय राठोड गायब नसून संपर्कात असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. संजय राठोड यांच्याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली […]