उत्तर प्रदेशातील विदारक स्थिती; ऑक्सिजन मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास
वायरल झालं जी

उत्तर प्रदेशातील विदारक स्थिती; ऑक्सिजन मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास

लखनौ : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता अनेक राज्यांच्या आरोग्य व्यवस्था कोलमडल्या आहेत. उत्तर प्रदेशातही रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. बहराइचमधल्या अशाच एका व्हिडिओनं उत्तर प्रदेशातील विदारक परिस्थिती समोर आली आहे. आईला ऑक्सिजन मिळत नसल्याने मुलीनं आईला स्वतः तोंडाद्वारे ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही महिलेचा जीव वाचवणं शक्य झालं नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/INCUttarPradesh/status/1388766186767216644

हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एका कोरोनाग्रस्त महिलेला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून ती तडफडत होती. त्यावेळी तिच्या मुलीनं काहीही पर्याय समोर दिसेना म्हणून तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशमधल्या आणि प्रामुख्याने बहराईचमधल्या या रुग्णालयाची काय अवस्था आहे हे समोर आलं आहे. या मुलीनं अनेक प्रयत्न करूनही ती आईला वाचवू शकली नाही. प्रत्यक्षात ऑक्सिजनचा एवढा तुटवडा असूनही प्रशासन सर्वकाही आलबेल असल्याप्रमाणे वागत आहे, त्यामुळं विरोधकांनी योगी सरकारला धारेवर धरलं जात आहे.

कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू होत असल्याच्या बातम्या यापूर्वीही समोर आल्या आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. पण केवळ ऑक्सिजन तुटवड्याची चर्चा किती दिवस करत राहणार. सरकार यावर मार्ग कधी काढणार असा सवाल आता विचारला जात आहे.